स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना आदरांजली

By Admin | Updated: August 10, 2016 01:40 IST2016-08-10T01:40:03+5:302016-08-10T01:40:03+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी गडचिरोली शहराच्या त्रिमूर्ती चौकातील स्वातंत्र्य सेनानी शहीद मारोती नरोटे .....

Honor the martyrs of freedom struggle | स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना आदरांजली

स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना आदरांजली

गडचिरोली, चामोर्शीत कार्यक्रम : स्व. मारोती नरोटे यांच्या योगदानाला दिला उजाळा
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी गडचिरोली शहराच्या त्रिमूर्ती चौकातील स्वातंत्र्य सेनानी शहीद मारोती नरोटे यांच्या स्मारकावर पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी खा. मारोतराव कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, जि. प. उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, पं. स. सदस्य अमिता मडावी, नामदेव गडपल्लीवार, काशिनाथ भडके, पी. टी. मसराम, आरिफ कनोजे, बाळू मडावी, एजाज शेख, वशिम खान आदींसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन करून स्वातंत्र्य सेनानी स्व. मारोती नरोटे यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे येथील त्रिमूर्ती चौकातील हुतात्मा स्मारकावर पूजन करून माल्यार्पण करून स्वातंत्र्य सेनानी स्व. मारोती राघोबा नरोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी न. प. उपाध्यक्ष अरूण हरडे, गोविंदराव बानबले, सोनाली पुण्यपवार, नामदेव गडपल्लीवार, रामचंद्र वाढई, तुकाराम पुरमवार, प्रशांत पोरेड्डीवार, प्रकाश तुम्पल्लीवार, दिलीप आखाडे, लक्ष्मण घोंगळे, सचिन चौधरी, शरद धाईत, सुधाकर धाईत, सुरेश आखाडे, दुर्योधन रायपुरे, अविनाश श्रीरामवार, देवराव खोबरे, सुधाकर पाराशर, विजय धकाते, हरिदास गेडाम, शेखर मडावी, योगेश निमगडे, नीलेश कोटगले, राजू डांगेवार आदीसह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चामोर्शी शहरात मंगळवारी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ. देवराव होळी यांनी बालउद्योनात जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. तसेच चामोर्शी शहराच्या आठवडी बाजारातील स्मृती स्मारकावर माल्यार्पण करून स्वातंत्र्य सेनानी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज पालारपवार, दिलीप चलाख, चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक प्रशांत ऐगलोपवार, नगरसेवक रामेश्वर सेलोकर तसेच रवी बोमनवार, आनंद गण्यारपवार, रमेश अधिकारी, जयराम चलाख, अनिल भैसारे, विनोद गौरकर, साईनाथ बुरांडे, मोलिद साखरे, राजू वरघंटीवार, किशोर गटकोजवार, प्रशांत पालारपवार आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. (लोकमत वृत्तसेवा)

Web Title: Honor the martyrs of freedom struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.