अजय उरकुडे यांना आदरांजली
By Admin | Updated: July 31, 2016 02:11 IST2016-07-31T02:11:53+5:302016-07-31T02:11:53+5:30
शहीद वीर अजय उरकुडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अजय उरकुडे यांना आदरांजली
चित्रकला स्पर्धा : विद्यार्थी, पालकांची उपस्थिती
गडचिरोली : शहीद वीर अजय उरकुडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शहीद अजय उरकुडे यांना उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमपाल फुलझेले होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय उरकुडे, सरोते, आकनुरवार, उईके, विलास राऊत, प्राचार्य श्वेता उरकुडे आदी उपस्थित होते. स्मृती दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम गटातून पहिल्या क्रमांक रिया फुलझेले, द्वितीय क्रमांक वंश किरंगे, दुसऱ्या गटातून प्रथम क्रमांक आदित्य बघेल, द्वितीय क्रमांक अनुष्का धाईत यांनी पटकाविला. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. संचालन प्रिती दहाके, प्रास्ताविक बोडगे तर आभार राजश्री बुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मनिषा बांगरे, मंगला लोणारे, छाया टिंगुसले, सुनिल शेरकी, विना चिताळे, मंगला पगाडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)