शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
2
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
3
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
4
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
5
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
6
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
7
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
8
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
9
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
10
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
11
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
12
मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत
13
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
14
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
15
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
16
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?
17
लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
18
मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित
19
हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय
20
जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

By संजय तिपाले | Published: January 29, 2024 5:46 PM

पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली.

गडचिरोली : येथील एका सहायक अभियंत्याला 'कॉलगर्ल'च्या माध्यमातून 'हानीट्रॅप'मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार २९ जानेवारीला उजेडात आला. नागपुरातील एका पत्रकार, पोलिस अंमलदारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आरोपींत दोन महिलांचा समावेश आहे.

गडचिरोली येथे एक सहायक अभियंता कार्यरत आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात एका कॉल गर्लसोबत हे अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये दोघांनी सोबत वेळ घातला, त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. दरम्यान, या कॉल गर्लने नंतर ही माहिती तिच्या ओळखीचा कथित पत्रकार रविकांत कांबळे यास दिली. त्याने अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली, तर पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली.

मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी  गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी  व चमू रवाना केला. सोमवारी नागपूर येथे सापळा रचून टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींना गडचिरोलीत आणले असून कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपींमध्ये यांचा समावेशकथित पत्रकार रविकांत कांबळे, पोलिस अंमलदार सुशील गवई, रोहित अहिर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या तिघांसह एक महिला असे चौघे ताब्यात आहेत, तर एक महिला आरोपी आहे.  अनेकांना जाळ्यात ओढल्याचा संशयदरम्यान, या टोळीत कॉल गर्लसह पोलिस व पत्रकार यांचा समावेश आढळला आहे. नियोजनबद्धपणे सावज जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल करत खंडणी उकळण्याचा धंदाच या टोळीने मांडला होता, पण बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार देण्यास धजावत नव्हते, यामुळे टोळीचे धाडस वाढले होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या कारवाईनंतर टोळीचे शिकार झालेले आणखी काही जण तक्रार देण्यासाठी पुढे येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली