गृहकर वसुली केवळ ५२ टक्के
By Admin | Updated: February 23, 2015 01:35 IST2015-02-23T01:29:38+5:302015-02-23T01:35:27+5:30
प्रत्येक ग्रामपंचायतींनी दरवर्षी १०० टक्के कर वसुली करण्याचे ग्राम विकास विभागाचे निर्देश आहेत.

गृहकर वसुली केवळ ५२ टक्के
लोकमत विशेष
दिलीप दहेलकर गडचिरोली
प्रत्येक ग्रामपंचायतींनी दरवर्षी १०० टक्के कर वसुली करण्याचे ग्राम विकास विभागाचे निर्देश आहेत. मात्र कर वसुलीबाबतची प्रभावी कार्यवाही अनेक ग्रामपंचायतींनी न केल्यामुळे बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीची जानेवारी २०१४ अखेरपर्यंतची गृहकर वसुली केवळ ५२.३४ टक्के आहे. तर पाणीपट्टी कर वसुली ४९.५९ आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रा.पं.ना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहे. गडचिरोली पंचायत समितीमधील सर्व ग्रामपंचायतीकडे गृहकराची मागील थकबाकी ४४.४३ लाख रूपये आहे. या चालू वर्षात गृहकरापोटी १०५.५ रूपयांची मागणी आहे. सर्व ग्रामपंचायतींची एकूण १४९.९३ लाख रूपयाची मागणी आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी ९१.०१ लक्ष रूपयांची वसुली २०१५ च्या जानेवारी अखेरपर्यंत वसुली केली. या कर वसुलीची टक्केवारी ६०.७० आहे.
आरमोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची गृहकराची एकूण मागणी २०३.७५ रूपये आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी २०१५ च्या जानेवारी अखेरपर्यंत १०४.५३ लक्ष रूपयाची गृहकर वसुली केली. याची टक्केवारी ५१.३० आहे. देसाईगंज पंचायत समितींतर्गत सर्व ग्रामपंचायतीची गृहकराची एकूण मागणी ६४.९५ लक्ष रूपयांची आहे. यापैकी जानेवारी अखेरपर्यंत ग्रा.पं.नी ३१.१८ लक्ष रूपयाची गृहकर वसुली केली. याची टक्केवारी ४८.१ आहे. कुरखेडा पंचायत समितींतर्गत सर्व ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू अशी एकूण ६२.५६ लक्ष रूपयाची गृहकराची मागणी आहे. यापैकी जानेवारी अखेरपर्यंत ग्रा.पं.नी २६.२७ लक्ष रूपयाची कर वसुली केली. याची टक्केवारी ४१.९९ आहे. कोरची पंचायत समितींतर्गत सर्व ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षांची मिळून एकूण १६.८६ लक्ष रूपयाची मागणी आहे. यापैकी जानेवारी अखेरपर्यंत १३.८५ लक्ष रूपयांची वसुली केली. याची टक्केवारी ८२.१५ आहे. धानोरा पंचायत समितींतर्गत सर्व ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून एकूण ६१.४२ यापैकी जानेवारीअखेरपर्यंत ३४.४० लक्ष रूपयाची ग्रा.पं.नी गृहकर वसुली केली. याची टक्केवारी ५६.०१ आहे.
चामोर्शी पं.स. अंतर्गत सर्व ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून गृहकराची एकूण मागणी २३५.५८ लक्ष रूपये आहे. ग्रा.पं.नी जानेवारी अखेरपर्यंत १०६.०१ लक्ष रूपयाची गृहकर वसुली केली. याची टक्केवारी ४५ आहे. मुलचेरा पं.स. अंतर्गत सर्व ग्रा.पं.ची गृहकराची एकूण मागील ३१.५७ लक्ष रूपये होती. यापैकी ग्रा.पं.नी १९.६० लक्ष रूपये गृहकर वसुली केली. याची टक्केवारी ६२.०८ आहे.