गृह राज्यमंत्र्यांनी घेतली जखमी पोलीस शिपायाची भेट
By Admin | Updated: December 8, 2014 22:34 IST2014-12-08T22:34:56+5:302014-12-08T22:34:56+5:30
जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस शिपायाची राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री राम शिंदे व आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागपूर येथील

गृह राज्यमंत्र्यांनी घेतली जखमी पोलीस शिपायाची भेट
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस शिपायाची राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री राम शिंदे व आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागपूर येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये जाऊन आज सोमवारला भेट घेतली.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील विशेष अभियान पथकात कार्यरत पोलीस शिपाई दुधराम चरणदास चव्हारे हे ६ डिसेंबर २०१४ रोजी नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूरच्या आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज सोमवारला गृह राज्यमंत्री राम शिंदे व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी पोलीस शिपाई चव्हारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. तुषार भुर्रे यांनी पोलीस शिपाई चव्हारे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. यावेळी आमदार मितेश भांगडिया, संजय भेगडे, भिमराव तापकिर आदी उपस्थित होते.