आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे धरणे
By Admin | Updated: August 21, 2016 02:32 IST2016-08-21T02:32:05+5:302016-08-21T02:32:05+5:30
खासगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी शिक्षक

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे धरणे
निवेदन सादर : शिक्षक भारती आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे आंदोलन
गडचिरोली : खासगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी शिक्षक भारती गडचिरोली जिल्हा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर केले.
अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने ८ जून रोजी काम नाही तर वेतन नाही, हा शासन निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णय अत्यंत अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, आश्रमशाळेत प्रवेशित २० ते ४० विद्यार्थी संख्या परिक्षण अनुदान व शिक्षक पदमान्यतेस ग्राह्य धरावी, निवासी विद्यार्थ्यांना बौद्धिक सुविधा व गुणवत्ता वाढण्यासाठी परिक्षण अनुदानात वाढ करावी, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या कर्मचाऱ्यांना देण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनवार, जिल्हाध्यक्ष सतीश पवार, विभागीय अध्यक्ष यादवराव धानोरकर, देविदास लांजेवार, सुनील अवसरे, सुधीर झंझाळ, सुधीर भोयर, महेश बोरेवार, संदीप भोयर, संगीता दर्रो यांनी केले. (नगर प्रतिनिधी)