आक्रोश सभेत हिंदुत्ववाद्यांनी केला केरळ सरकारचा निषेध

By Admin | Updated: March 2, 2017 01:57 IST2017-03-02T01:57:20+5:302017-03-02T01:57:20+5:30

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Hindu activists protested by the Kerala government in protest | आक्रोश सभेत हिंदुत्ववाद्यांनी केला केरळ सरकारचा निषेध

आक्रोश सभेत हिंदुत्ववाद्यांनी केला केरळ सरकारचा निषेध

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संघ स्वयंसेवकांची हत्या
गडचिरोली : केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात पार पडलेल्या आक्रोश सभेत केरळ सरकारचा हिंदूत्ववादी संघटनांनी निषेध केला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक जयंतराव खरवडे, जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, आ. डॉ. देवराव होळी, ब्रम्हपुरीचे माजी आ. अतुल देशकर, नगर संघचालक रमेश चन्ने, साकेत भानारकर, स्वदेशी जागरण मंचाचे मनोज अलोणी, जिल्हा सहकार्यवाह विकास वडेट्टीवार, विजय सोमनकर, न. प. चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, शिक्षण सभापती गुलाबराव मडावी, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, अनिल पोहणकर, अविनाश महाजन, प्रकाश गेडाम, पं. स. सदस्य आनंद भांडेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, श्रीकांत पतरंगे, वासुदेव बट्टे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर इंदिरा गांधी चौकात हिंदूत्ववादी संघटनांतर्फे जनआक्रोश सभा घेण्यात आली. यावेळी सभेला आ. डॉ. देवराव होळी, विभाग संघ चालक जयंत खरवडे, ब्रह्मपुरीचे माजी आ. अतुल देशकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, घिसूलाल काबरा, मानवाधिकार परिषदेचे गजेंद्र डोमळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संदीप लांजेवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Hindu activists protested by the Kerala government in protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.