शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठतर्फे क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, शारीरिक शिक्षण विभाग तसेच इतर पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कुलगुरु प्रा. वरखेडी यांनी सांगीतले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात आझादी का अमृत महोत्सव या संदर्भात कार्यक्रमाची आखणी करण्याविषयी विद्यापीठातील विभाग प्रमुख व प्राध्यापक यांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच विद्यापीठ सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आझादी का अमृत महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले असून यातून विद्यापीठ प्रशासनातर्फे क्रांतिकारकांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात येणार आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, शारीरिक शिक्षण विभाग तसेच इतर पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कुलगुरु प्रा. वरखेडी यांनी सांगीतले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले. चिमूर येथील क्रांती भूमीची त्यांनी विशेत्वाने आठवण केली. हा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रूजावी यासाठी आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागाच्यावतीने क्रांतिकारकांच्या विषयावर चर्चासत्र,  राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने राष्ट्रगीतावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने सायकल रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, नव उपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अनिता लोखंडे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे  संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार आदी हजर  हाेते.

 

टॅग्स :universityविद्यापीठ