येथे वाहनाच्या टपावर बसून करावा लागतो धाेकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:51+5:302021-09-21T04:40:51+5:30
शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिरोंचा तालुक्यातील कोर्ला, कोपेला, रमेशगुडम या गावांना जाण्यासाठी पक्के रस्तेच तयार करण्यात आले नाहीत. शिक्षण, ...

येथे वाहनाच्या टपावर बसून करावा लागतो धाेकादायक प्रवास
शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिरोंचा तालुक्यातील कोर्ला, कोपेला, रमेशगुडम या गावांना जाण्यासाठी पक्के रस्तेच तयार करण्यात आले नाहीत. शिक्षण, विविध साहित्यांची खरेदी, आरोग्याच्या समस्या, बँकेची कामे आणि शेतीविषयीच्या योजनांचा लाभ आदी विविध कामांसाठी तालुका मुख्यालय गाठण्याशिवाय त्या गावकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. मात्र, चांगले रस्तेच नसल्याने घनदाट जंगलातून खड्डेमय रस्त्यावरून, नदी-नाले पार करत प्रवास करण्याचा धोका खासगी प्रवासी वाहनधारक स्वीकारत नाहीत. पावसाळ्यात तर संपर्कच तुटतो. अशा परिस्थितीत जे मोजके वाहनधारक ही जोखीम पत्करतात त्यांच्या वाहनात विद्यार्थी, नागरिक, लहान मुलांना घेऊन महिला आणि वृद्धांची एकच गर्दी होते.
(बॉक्स)
रस्त्याअभावी बससेवेपासून वंचित
चांगला रस्ता नसल्याने या गावात आतापर्यंत बससेवा पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांना ट्रॅक्समधून प्रवास करावा लागतो. या मार्गावर एक किंवा दोन ट्रॅक्स उपलब्ध आहेत. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने नाईलाजास्तव ट्रॅक्सच्या टपावर लहान मुले आणि महिलांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. खड्डेमय रस्त्याने हा प्रवास धोकादायक असून अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. वारंवार मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.