शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

हेमलकसातील तलाव तुडूंब

By admin | Updated: September 4, 2016 01:53 IST

हेमलकसा व जिंजगाव येथील तलावाचे खोलीकरण लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने झाल्याने सध्या हे दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत.

खोलीकरणाचा परिणाम : शेतीसाठी मुबलक पाणी व मत्स्य पालनालाही मिळाला वावभामरागड : हेमलकसा व जिंजगाव येथील तलावाचे खोलीकरण लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने झाल्याने सध्या हे दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्याबरोबरच मत्स्य व्यवसायासही वाव मिळाला आहे.भामरागड तालुक्यात तलाव, बोड्या भरपूर प्रमाणात आहेत. परंतु अनेक वर्षांपासून तलाव व बोड्यांचे खोलीकरण न झाल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. हेमलकसा व जिंजगावच्या धर्तीवर खोलीकरणाची गरज अधोरेखित झाली आहे. भामरागड तालुक्यात धान पीक मुख्य पीक आहे. धानाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. या तालुक्यात तलाव व बोड्यांची कमतरता नाही. परंतु अनेक तलाव व बोड्या खोलीकरणाअभावी उथळ झाल्या आहेत. आलापल्ली-भामरागड मार्गावरील हेमलकसा येथे इंदिरा गांधी यांच्या काळात नैसर्गिक तलाव बांधण्यात आले. परंतु ५० पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी उलटूनही या तलावाचा उपसा झाला नव्हता. दरवर्षी सदर तलावातील पाणी साठवणूक क्षमता कमी होत होती. त्यामुळे तलावात जास्त पाणी साचत नव्हते. तसेच जिंजगाव येथील तलावाचेही अनेक दिवसांपासून खोलीकरण झाले नव्हते. अनिकेत आमटे यांनी पुढाकार घेऊन सदर तलावाचे खोलीकरण केले. त्यामुळे तलावात सध्या मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध आहे. दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत.(तालुका प्रतिनिधी)