हेमलकसातील तलाव तुडूंब

By Admin | Updated: September 4, 2016 01:53 IST2016-09-04T01:53:03+5:302016-09-04T01:53:03+5:30

हेमलकसा व जिंजगाव येथील तलावाचे खोलीकरण लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने झाल्याने सध्या हे दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत.

Hemlakasan Lake Tandum | हेमलकसातील तलाव तुडूंब

हेमलकसातील तलाव तुडूंब

खोलीकरणाचा परिणाम : शेतीसाठी मुबलक पाणी व मत्स्य पालनालाही मिळाला वाव
भामरागड : हेमलकसा व जिंजगाव येथील तलावाचे खोलीकरण लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने झाल्याने सध्या हे दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्याबरोबरच मत्स्य व्यवसायासही वाव मिळाला आहे.भामरागड तालुक्यात तलाव, बोड्या भरपूर प्रमाणात आहेत. परंतु अनेक वर्षांपासून तलाव व बोड्यांचे खोलीकरण न झाल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. हेमलकसा व जिंजगावच्या धर्तीवर खोलीकरणाची गरज अधोरेखित झाली आहे.
भामरागड तालुक्यात धान पीक मुख्य पीक आहे. धानाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. या तालुक्यात तलाव व बोड्यांची कमतरता नाही. परंतु अनेक तलाव व बोड्या खोलीकरणाअभावी उथळ झाल्या आहेत. आलापल्ली-भामरागड मार्गावरील हेमलकसा येथे इंदिरा गांधी यांच्या काळात नैसर्गिक तलाव बांधण्यात आले. परंतु ५० पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी उलटूनही या तलावाचा उपसा झाला नव्हता. दरवर्षी सदर तलावातील पाणी साठवणूक क्षमता कमी होत होती. त्यामुळे तलावात जास्त पाणी साचत नव्हते. तसेच जिंजगाव येथील तलावाचेही अनेक दिवसांपासून खोलीकरण झाले नव्हते.
अनिकेत आमटे यांनी पुढाकार घेऊन सदर तलावाचे खोलीकरण केले. त्यामुळे तलावात सध्या मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध आहे. दोन्ही तलाव तुडूंब भरले आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hemlakasan Lake Tandum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.