मृत पाेलिसांच्या तीन कुटुंबीयांना बँकेकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:57+5:302021-08-28T04:40:57+5:30
जिल्हा पोलीस मुख्यालयात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, नागपूर येथील ॲक्सिस बँकेचे ...

मृत पाेलिसांच्या तीन कुटुंबीयांना बँकेकडून मदतीचा हात
जिल्हा पोलीस मुख्यालयात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, नागपूर येथील ॲक्सिस बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अजीत श्रीवास्तव, गडचिरोली येथील शाखा व्यवस्थापक राकेश वल्लालवार व उपव्यवस्थापक स्वाती यादव उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलातील प्रभाकर टेकाम, सूर्यभान माेहुर्ले व नरेंद्रकुमार समर्थ आदी तीन जवान कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना काेराेनामुळे मृत्यू पावले हाेते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर माेठे संकट काेसळले. ही समस्या ओळखून ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत जवानांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत केली. कोरोनामुळे मृत पावलेल्या कुठल्याही ग्राहकांना बँकांनी आधार दिला नाही. मात्र, ॲक्सिस बँकेने सामाजिक बांधिलकी जाेपासून मदत केली, असे बँकेच्या व्यवस्थापकांनी याप्रसंगी म्हटले.