शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

नक्षल बंदमुळे अडकलेल्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना राहत नाही.

ठळक मुद्देसीआरपीएफच्या ११३ बटालियनचा पुढाकार : गरोदर मातेवर केले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नक्षलवाद्यांनी २ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताहानिमित्त पुकारलेल्या बंदमुळे दुर्गम भागात जाणाऱ्या काही बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी कामासाठी धानोरा येथे आलेले नागरिक धानोरा येथेच अडकले. ही बाब सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांना माहित झाल्यानंतर त्यांनी या सर्व प्रवाशांना सीआरपीएफ कॅम्पमध्ये आणून त्यांचे जेवन व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली.नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना राहत नाही.मालेवाडा परिसरातील काही नागरिक धानोरा व चातगाव येथे आले होते. मात्र मालेवाडाकडे जाणारी बसफेरी रद्द करण्यात आली. तसेच खासगी वाहनेही बंद होती. परिणामी या परिसरातील जवळपास १० नागरिक धानोरा येथेच अडकले.धानोरा येथे त्यांचा कोणताही नातेवाईक नसल्याने जेवन व राहण्याची अडचण निर्माण झाली. त्यातच चांदवना गावातील बंबलेश्वरी सोनार ही गर्भवती माता सर्च येथे तपासणीसाठी आली होती. सोबत काही नागरिक सुध्दा होते. या सर्व नागरिकांना जेवन देण्यात आले. जेवनानंतर बंबलेश्वरीची बीपी वाढल्याने तिला धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी भरती केले. तिच्यासोबत आलेले नातेवाईकही रूग्णालयात थांबले.या सर्वांना ३ डिसेंबर रोजी त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. या नागरिकांनी सीआरपीएफचे आभार मानले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस