शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा!

By Admin | Updated: September 1, 2016 01:45 IST2016-09-01T01:45:53+5:302016-09-01T01:45:53+5:30

पोळा व गणेश उत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,

Help to maintain peace and order in the city! | शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा!

शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा!

किरण अवचर : चामोर्शीत शांतता समितीची सभा
चामोर्शी : पोळा व गणेश उत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी बुधवारी शांतता समितीच्या सभेत केले.
पोलीस ठाण्यात आयोजित शांतता सभेला पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, नगरसेवक प्रमोद वायलालवार, नगर पंचायत सभापती विजय शातलवार, सभापती सुमेध तुरे, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, मनोहरराव पालारपवार, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, माजी सभापती अमोल तिवारी, त्रियुगी दुगे, दिवाकर यासलवार, विलास ठोंबरे, शंकर साखरे, माणिकचंद कोहळे, श्याम बन्सोड, रामजी चलाख, उष्टूजी पिपरे, एकनाथ बुरांडे, सुरेश नैताम, सुभाष कर्णे, विठ्ठल किरमे उपस्थित होते.
पोळा उत्सवात बैलजोड्या ठरलेल्या ठिकाणाहून शांततेत काढणे, तसेच बसस्थानक तसेच रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे, अवैध दारूविक्री, यासह विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Help to maintain peace and order in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.