नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:06 IST2018-02-15T01:06:06+5:302018-02-15T01:06:17+5:30

अल्प पाऊस व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील ५० टक्के धानपीक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेले. आता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला.

Help the damaged farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांची मागणी : प्रसंगी तीव्र आंदोलन छेडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अल्प पाऊस व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील ५० टक्के धानपीक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेले. आता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. येथील शेतकरी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र यंदाच्या खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भात असताना मावा, तुडतुडा, लष्कर अळी, खोडकिडा व इतर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी तीन ते चारदा कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र धानपिकावरील कीड व रोग आटोक्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील तूर, हरभरा, गहू, उडीद, मूग, मक्का, मिरची आदी पिके उंबरठ्यावर आली होती. तसेच भाजीपाला पिकही फुलले होते. मात्र १२ व १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. उसेंडी यांनी दिला आहे.

Web Title: Help the damaged farmers