लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सिव्हीक अॅक्शन उपक्रमाअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनमार्फत धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पुरूष व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिलाई मशीन, बांधकाम मिस्त्रीचे साहित्य व वाहन चालविण्याचा परवाना वितरित करण्यात आला. यामुळे एकूण ५६ कुटुंबांना स्थायी रोजगार उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागातील पुरूष व महिलांना प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. गावात चालू शकतील, असे उद्योग केल्यास बेरोजगारीचे संकट दूर होऊन ते आत्मनिर्भर होतील. या उद्देशाने सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ यांच्या पुढाकाराने धानोरा तालुक्यातील २० महिलांना शिम्पी कामाचे प्रशिक्षण दिले. तसेच १६ पुरूषांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर संपूर्ण प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन व इतर साहित्याचे वितरण केले. बांधकाम मिस्त्रीचे काम करणाऱ्या नागरिकांना बांधकामासाठी आवश्यक असलेली कीट उपलब्ध करून दिली. यामध्ये स्वसंरक्षणाच्या साहित्याचा सुद्धा समावेश आहे.चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना वाहन परवाना देण्यात आला. अशा पद्धतीने एकूण ५६ कुटुंबांना स्थायी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे हा रोजगार करणारे व्यक्ती आत्मनिर्भर झाले आहेत. उत्पन्न वाढल्याने त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणार आहे.साहित्य वितरित करतेवेळी कमाडंट जी.डी.पंढरीनाथ यांच्यासह नगर पंचायत उपाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, तारा कोटांगले आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जी.डी.पंढरीनाथ म्हणाले की, दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाल्यास त्यांचे राहणीमान उंचावेल. ते आपल्या मुलाबाळांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, जेवण देऊ शकतील. रोजगारामुळे इतर समस्या दूर होण्यास मदत होतील. त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम सीआरपीएफतर्फे यापुढेही राबवून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे आवाहन केले.
सीआरपीएफच्या मदतीने ५६ कुटुंबांना मिळाला स्थायी रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST
ग्रामीण भागातील पुरूष व महिलांना प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. गावात चालू शकतील, असे उद्योग केल्यास बेरोजगारीचे संकट दूर होऊन ते आत्मनिर्भर होतील. या उद्देशाने सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ यांच्या पुढाकाराने धानोरा तालुक्यातील २० महिलांना शिम्पी कामाचे प्रशिक्षण दिले. तसेच १६ पुरूषांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले.
सीआरपीएफच्या मदतीने ५६ कुटुंबांना मिळाला स्थायी रोजगार
ठळक मुद्दे११३ बटालियनचा उपक्रम : २० महिलांना शिलाई मशीन, १६ युवकांना वाहन परवान्याचे वितरण