हिराचंदवर नागपुरात होणार उपचार
By Admin | Updated: April 8, 2017 01:55 IST2017-04-08T01:55:47+5:302017-04-08T01:55:47+5:30
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच ..

हिराचंदवर नागपुरात होणार उपचार
जिल्हा रूग्णालयाला भेट : विजय वडेट्टीवार यांनी घेतली जबाबदारी;आरोग्य सेवेवर नाराजी
गडचिरोली : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देऊन पारडी येथील रूग्ण हिराचंद परशुराम पुडके यांच्यावर नागपुरात उपचार करण्याची जबाबदारी घेतली.
आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देऊन पारडी येथील हिराचंद परशुराम पुडके, व्याहाड येथील भैय्याजी भोयर व ब्रम्हपुरी तालुक्याच्या मुडझा येथील रोशन गोविंदा नंदेश्वर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिराचंद पुडके यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय फॅक्चर झाला आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने आ. वडेट्टीवार यांनी हिराचंदच्या शस्त्रक्रिची जबाबदारी घेऊन त्याला ताबडतोब नागपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले. तसेच व्याहाड बूज येथील भैय्याजी भोयर व मुडझा येथील रोशन नंदेश्वर यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांवर योग्य उपचार होत नसल्याबद्दल आ. विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. रूग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासंदर्भात आपण आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. अनिल रूडे, युवक काँगे्रसचे कुणाल पेंदोरकर, सतीश नंदकिशोर, मंगेश दिवटे, कमलेश खोब्रागडे, स्नेहल संतोषवार, दीपक गद्देवार, सुरेश म्हशाखेत्री हजर होते. (शहर प्रतिनिधी)