आराेग्य कर्मचाऱ्यांना मुलाखतीच्या दिवशीच मिळेल नियुक्तिपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:58+5:302021-04-20T04:37:58+5:30
दर साेमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक मुलाखती घेऊन डाॅक्टर व अधिपरिचारिका यांची निवड करीत ...

आराेग्य कर्मचाऱ्यांना मुलाखतीच्या दिवशीच मिळेल नियुक्तिपत्र
दर साेमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक मुलाखती घेऊन डाॅक्टर व अधिपरिचारिका यांची निवड करीत हाेते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील अधिकारी अनुपम महेशगाैरी हे संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यास टाळाटाळ करीत हाेते. याबाबत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे यांनी तक्रार केली हाेती. तसेच लाेकमतनेही वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत ज्या दिवशी मुलाखती पार पडतील त्याच दिवशी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र दिले जातील, असा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आहे. तसेच ज्या उमेदवारांचे नियुक्तिपत्र देण्यात आले नव्हते त्यांना लाेकमतच्या वृत्तानंतर तत्काळ नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांचे नियुक्तिपत्र थांबवून अन्याय केला जात हाेता त्यांना न्याय मिळाला आहे.
बाॅक्स ....
अनुपम महेशगाैरी यांची हकालपट्टी करा
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियुक्तिपत्र थांबविण्यास अनुपम महेशगाैरी हेच जबाबदार हाेते. यामध्ये काही आर्थिक व्यवहार हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनुपम महेशगाैरी हे यापूर्वी जिल्हा परिषदेच्या एनआरएचएम विभागात कार्यरत हाेते. त्या कालावधीत झालेले साहित्य खरेदी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत चाैकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी डाॅक्टर सेलचे सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे यांनी केली आहे.