वैरागड भागात आरोग्य सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:06 IST2017-08-30T23:06:30+5:302017-08-30T23:06:45+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पळसगाव, पाथरगोटा, जोगीसाखरा, आष्टा, अरसोडा,...

वैरागड भागात आरोग्य सेवा कुचकामी
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पळसगाव, पाथरगोटा, जोगीसाखरा, आष्टा, अरसोडा, शेगाव व सायगाव आदी सात उपकेंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नसल्याने या सर्वच उपकेंद्राची आरोग्यसेवा गेल्या अनेक दिवसांपासून अस्थिपंजर झाली आहे.
उपकेंद्रातील आरोग्यसेविका व आरोग्यसेवक मुख्यालयी न राहता तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात. ग्रामपंचायतीच्या गावी उपकेंद्राची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. या उपकेंद्रात सोयीसुविधाही उपलब्ध आहे. मात्र आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता आरमोरी, ब्रह्मपुरी, गडचिरोेली, देसाईगंज शहरात निवासी राहून आपले कर्तव्य बजावतात. अप-डाऊन प्रणालीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम झाला आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशाच स्थितीत मुख्यालयी राहून प्रभावी आरोग्यसेवा देणे गरजेचे आहे. जोगीसाखरा येथील उपकेंद्रात पाच महिन्यांपूर्वी नवे आरोग्यसेवक रूजू झाले, मात्र त्यांचे नावही नागरिकांना माहीत नाही. पळसगाव येथील आरोग्य सेवकाचे पद रिक्त आहे.
अरसोडा येथे उपकेंद्राची नवी इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचे उद्घाटन अद्यापही झाले नाही. आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षण व गृहभेटी या आरोग्य कर्मचाºयांकडून होताना दिसून येत नाही.