चामाेर्शीत आशांची आराेग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:54+5:302021-01-10T04:27:54+5:30

चामाेर्शी : तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने चामाेर्शी येथे आशा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आशांची आराेग्य तपासणी करण्यात ...

Health check-up of skinny hopes | चामाेर्शीत आशांची आराेग्य तपासणी

चामाेर्शीत आशांची आराेग्य तपासणी

चामाेर्शी : तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने चामाेर्शी येथे आशा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आशांची आराेग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. भूषण लायबर हाेते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोरे, डॉ.भैसारे, तालुका आरोग्य सहाय्यक संदीप वैरागडे, संनियंत्रक गोविंदा कडस्कर, क्षयरोग पर्यवेक्षक स्नेहा गायकवाड उपस्थित होते. काेराेना काळात आराेग्य सेवा देणे व शासनाची माेहीम राबविण्याचे काम आशांनी प्रामाणिकपणे केले आहे, असे प्रतिपादन डाॅ. लायबर यांनी केले. दरम्यान सांस्कृतिक कार्यकमातून आशांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले. यात सहभागी आशांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन गट प्रवर्तक वर्षा वाटे प्रास्ताविक तालुका समूह संघटक मिताली रामटेके तर

आभार गट प्रवर्तक प्रतिभा कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पंकज मेश्राम, वितराज कुनघाडकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Health check-up of skinny hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.