शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मुख्यालय वडसाला, समादेशक कार्यालय नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 AM

२० फेब्रुवारी १९९३ ला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना झाली. नागपूरच्या गट क्रमांक ४ मधून याचे काम सुरू झाले. काही वर्षानंतर विसोराजवळच्या बदक पैदास केंद्राला लागून असलेली १५० एकर जागा या गट १३ ला देण्यात आली. कोट्यावधी रुपये खर्च करून कँम्पच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पण पूर्ण झाले. त्यात समादेशक कार्यालय पूर्णत्वास आले आहे.

ठळक मुद्देएसआरपीएफ गट क्रमांक १३ : विसोरानजीकच्या १५० एकर जागेवर उभारणार कँप

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : नक्षल कारवायांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २८ वर्षांपूर्वी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना केली. परंतु त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाची सुरक्षा, दळणवळण, प्रशासकीय सोईच्या दृष्टीने उपयुक्त शासकीय जागा उपलब्ध झाली नसल्याने समादेशक कार्यालय नागपुरात ठेवण्यात आले. आता विसोरानजिक समादेशक कार्यालय व कर्मचारी निवासस्थानासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली आहे. दीड वर्षांपूर्वी समादेशक कार्यालय व पहिल्या टप्प्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे कामही पूर्ण झाले आहे. पण अजूनही या गटाचा कारभार नागपुरातूनच सुरू आहे.२० फेब्रुवारी १९९३ ला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना झाली. नागपूरच्या गट क्रमांक ४ मधून याचे काम सुरू झाले. काही वर्षानंतर विसोराजवळच्या बदक पैदास केंद्राला लागून असलेली १५० एकर जागा या गट १३ ला देण्यात आली. कोट्यावधी रुपये खर्च करून कँम्पच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पण पूर्ण झाले. त्यात समादेशक कार्यालय पूर्णत्वास आले आहे. या गटास मंजूर असलेल्या सात कंपन्यांपैकी एका कंपनीचे अधिकारी, कर्मचारी विसोरा नजीकच्या कँम्पमध्ये राहात आहेत.सोबतच समादेशक कार्यालयाचे बांधकाम झाले असूनही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची संचालन व्यवस्था सांभाळणारे समादेशक कार्यालय नागपूर येथेच आहे. गट एकीकडे आणि तब्बल २८ वर्षांपासून समादेशक कार्यालय नागपुरात अशी स्थिती आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना व नक्षलवाद्यांच्या कारवायांचा विचार करता अधिकाऱ्यांचा पोलीस दलांसोबत तातडीने समन्वय होऊन वेळीच हालचाल होणे गरजेचे असते. त्यामुळे संपूर्ण गटाला निर्देश देणारे समादेशक, व इतर अधिकारी यांचे मुख्यालयी असणे आवश्यक असते.वरिष्ठांशी पत्रव्यवहार, पण अजून दखल नाहीविसोरानजीक देसाईगंज हे तालुका मुख्यालय आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठ, रेल्वे, नगरपालिका व मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने दळणवळण करण्यासाठी साधने उपलब्ध आहेत. या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जुलै २०२० ला नागपूर येथील समादेशक कार्यालय विसोरा येथील मुख्यालयी स्थानांतरण करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल नागपूर परिक्षेत्र यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप त्यावर हालचाली झालेल्या नाहीत.

टॅग्स :Policeपोलिस