साबांविचे कलवट ठरले विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
By Admin | Updated: September 25, 2014 23:24 IST2014-09-25T23:24:04+5:302014-09-25T23:24:04+5:30
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहाकडे तसेच राजे धर्मवराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या नवीन कलवटची आवश्यकता नव्हती, मात्र या ठिकाणी नवे कलवट तयार करण्यात आले.

साबांविचे कलवट ठरले विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
भामरागड : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहाकडे तसेच राजे धर्मवराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या नवीन कलवटची आवश्यकता नव्हती, मात्र या ठिकाणी नवे कलवट तयार करण्यात आले. यामुळे गावातील सांडपाणी चक्क रस्त्यावरून वाहत असून या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर कलवट विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे.
विश्रामगृह मार्गावर तयार करण्यात आलेले कलवट कोणत्या कामासाठी आहे, याची चर्चा गावभर आहे. या ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे या कलवटमधून पाण्याची विल्हेवाट होण्यासाठी या ठिकाणी नवीन नाला तयार करण्यात आला. आवश्यक नसलेल्या ठिकाणी कलवटचे बांधकाम होत असल्याची बाब ‘लोकमत’ने भामरागड ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. तरी सुद्धा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर या कलवटमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कलवटचे पाणी रस्त्यावर येत असल्याने शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. सदर कलवट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.