शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:01 IST

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

कूरखेडा (गडचिरोली) : शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखाने बारावीच्या परीक्षेत काॅपी करू देण्यासाठी चार दिवसांपूर्वी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रूपये घेतले. याच विद्यार्थ्यांनी पैसे देतानाचा व्हिडीओ काढून ताे बुधवारी समाजमाध्यमांवर व्हायरल केला. यामुळे गडचिराेली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

सध्या परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेला व्यक्ती तिथेच कनिष्ट महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. बारावीच्या परीक्षेत काॅपी करू देण्यासाठी त्याने सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतले. या विद्यार्थ्यांना त्याने घरी बाेलावून घेतले. आपल्या घरीच ताे पैसे घेत असताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्याला पैसे दिले त्यांचे नाव व माेबाइल नंबर ताे लिहून घेत आहे. पैसे देतेवेळी सात ते आठ विद्यार्थी हाेते. त्यामुळे त्यांच्यापैकी एक विद्यार्थी याबाबतचा व्हिडीओ काढत असल्याची भणकसुद्धा त्याला लागली नाही.

व्हिडीओ काढल्यानंतर त्याची माहिती संबंधित केंद्रप्रमुखाला देण्यात आली. हे कळताच केंद्रप्रमुखाच्या पायाखालची वाळू सरकली. त्या विद्यार्थ्याला घरी बाेलावून त्याला काही पैसे देऊन व्हिडीओ डिलिट करण्यास सांगितले. विद्यार्थ्याने पैसे घेतले, मात्र ताेपर्यंत हा व्हिडीओ त्याच्या मित्रांकडे व्हायरल झाला हाेता. बुधवारी ताे माेठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.

या व्हिडीओची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागावर पालकांचा दबाव वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्याच्याकडून परीक्षा केंद्रप्रमुख हे पद काढण्यात आले. शिक्षण विभागाचे अधिकारी व कुरखेडा पाेलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणाची अजूनही काेणत्याही व्यक्तीने पाेलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नाही. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणे ही बाब शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाने शिकविले व स्वत:ला त्यांचा गुरू मानताे त्याच विद्यार्थ्यांकडून काॅपी करण्यासाठी पैसे घेणे ही बाब अतिशय लांच्छनास्पद आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन या प्रकरणाची तक्रार पाेलिस ठाण्यामध्ये करावी अशी मागणी हाेत आहे.

‘मै कुछ नही करूंगा’

पैसे घेऊन झाल्यानंतर संबंधित प्राध्यापक ‘आपके लेव्हल पर कराे, मै कुछ नही करूंगा’ असे शेवटी म्हणत आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून ५०० रुपयांच्या नाेट घेताना व त्यांची नावे लिहिताना ताे स्पष्ट दिसून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने पाेलिस ठाण्यामध्ये तक्रार करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षाGadchiroliगडचिरोली