शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:07 PM

पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यावर काळाची झडप शेतातील झाडावर कोसळलेल्या वीजेने घेतला बळी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काळ हा कुणालाही सांगून येत नाही किंवा त्याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसते. घरी आपल्या आजीशी बोलून डोंगरसावंगी येथील आपल्या नातेवाईकाच्या शेतावर रोवणीसाठी व पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरविण्यासाठी गेलेल्या वडधा येथील यश वेणुदास राऊत या १६ वर्षीय विद्यार्थ्यावरही वीज बनून आलेल्या काळाने अचानक झडप घातली. पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

एका झटक्यात यशला काळाने हिरावले तर त्याचा चुलत भाऊ मनीष गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्वांचा लाडका असलेल्या यशच्या अचानक जाण्याने गावकरी हेलावून गेले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण त्यांच्या हळहळण्याने यश परत येणार नव्हता.यश अवघ्या दोन महिन्यांचा असताना त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. जन्मदात्या आईचे प्रेम, वात्सल्य व ममतेचा स्पर्शही त्याला अनुभवता आला नाही. तान्ह्या वयात त्याच्या आजी व काकाने त्याला तळहाताच्या फोळाप्रमाणे जपले. त्याचा सांभाळ करून त्याला आईवडिलांचे प्रेम दिले. त्याच्या हसण्याखेळण्याने घर कसे आनंदाने न्हाऊन निघत होते.

यश हा वृद्ध आजीचा आधारवड होता. घरची परिस्थिती गरीबीची असतानाही त्याला चांगले शिक्षण देण्याचे व खूप शिकविण्याची काका व आजीची इच्छा होती. तो वडधा येथील किसान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये यावर्षी शिक्षण घेणार होता. मात्र अचानक काळाने त्याच्यावर झडप मारली आणि त्याला आपल्या कवेत घेतले. क्षणात हसत्या खेळत्या यशला आपल्यातून हिरावून नेले. जीवनात चांगले शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न बघणाऱ्या यशला हे जीवनच सोडून कायमचे निघून जावे लागले.

सोमवारी सकाळी जेवण करून आजी व काकासोबत बोलून यश इतर महिला मजुरांसोबत डोंगरसावंगी येथे गेला. यश व मनीष शेतावर धानाच्या पेंढ्या पसरवित होते. अचानक दुपारी २ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. पाऊस व कडाडणाºया विजेपासून बचाव करण्याकरिता त्यांनी बांधालगतच्या मोठ्या किनीच्या झाडाचा आसरा घेतला. दरम्यान याच झाडावर वीज कोसळली आणि क्षणातच विजेच्या धक्क्याने यशचा दुदैवी मृत्यू झाला तर मनीष गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ ट्रॅक्टरने आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती आजी कौशल्या आणि काका दिलीप यांना कळताच त्यांना धक्काच बसला. घरातील एकुलता एक असलेल्या व आजीच्या कुशीत वाढलेल्या यशच्या अचानक जाण्याने आजीसह संपूर्ण राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

शाळा बंद असल्याने झाला घातवडधा येथील यश व मनीष राऊत या चुलत भावंडांची जोडी ही राम-लक्ष्मणासारखी होती. अत्यंत शांत, संयमी व सुस्वभावी असलेल्या यशला कुणीही कोणतेही काम सांगितले तरी तो नाही म्हणायचा नाही. दोघेही भाऊ शाळेत मिळूनच जायचे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने यावर्षी यश व मनीष हे भावंड आत्या-मामाच्या गावी डोंगरसावंगी येथे गेले. ऋषी रोहणकर यांच्या शेतात रोवणीसाठी धान रोपाच्या पेंढ्या पसरविण्यासाठी हे दोन भावंड चार ते पाच दिवसांपासून गावातील इतर मजुरांसोबत जात होते. दिवसभर शेतात पेंढ्या पसरविणे व सायंकाळी पुन्हा स्वत:च्या गावी वडधाला परतणे हा त्यांचा दिनक्रम होता.

अन् वाचला अनेकांचा जीवडोंगरसावंगीच्या ऋषी रोहणकर यांच्या शेतातील धानपीक रोवणीच्या कामावर त्या दिवशी अनेक महिला मजूर होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्यानंतर यश व मनिष झाडाखाली आसरा घेण्यासाठी आले. पण रोवणीचे थोडेच काम शिल्लक असल्यामुळे महिला मजूर पावसातच रोवणी करीत होत्या. पाच मिनीट आधी त्यांची रोवणी संपली असती तर सर्व मजूरही या यश आणि मनीष थांबले त्याच झाडाखाली गेले असते आणि यापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने त्या मजुरांना ‘काळ आला होता पण वेळ नाही’ याचा प्रत्यय आला.

टॅग्स :Deathमृत्यू