नक्षल्यांच्या भीतीची दहशत झुगारून ‘त्यांनी’ घेतले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:42+5:302021-09-19T04:37:42+5:30
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महिला शेतकऱ्यांकरिता भाजीपाला लागवड प्रशिक्षण मेळावा पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

नक्षल्यांच्या भीतीची दहशत झुगारून ‘त्यांनी’ घेतले प्रशिक्षण
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महिला शेतकऱ्यांकरिता भाजीपाला लागवड प्रशिक्षण मेळावा पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. १३ ते १६ सप्टेंबरपर्यंत हे प्रशिक्षण पाेलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे देण्यात आले. याप्रसंगी ते बाेलत हाेते.
दुर्गम भागातील शेतकरी वनालगत शेती कसत आहेत; परंतु ते तंत्रशुद्ध शेती करीत नसल्याने त्यातून निघणारे उत्पन्नाचे प्रमाणदेखील अत्यल्प आहे. हीच बाब हेरून पोलीस अधीक्षक गोयल यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भामरागड तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक स्त्रोत प्राप्त करून देण्याचे नियोजन केले. या अंतर्गत भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी महिलांना विविध फळरोपांवर कलमे करण्याबाबतसुद्धा अवगत करण्यात आले. यात ११४ महिला शेतकरी सहभागी झाल्या. त्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, भाजीपाला बियाणांच्या किट्स, झाडे तसेच साड्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, प्रकल्प उपसंचालक आबासाहेब धापते, विषय तज्ज्ञ (उद्यान) सुचित लाकडे, विषय तज्ज्ञ (अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड व रितेश मालगार उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, भामरागडचे प्रभारी अधिकारी किरण रासकर, लाहेरीचे अविनाश नळेगावकर, धोडराजचे राजाभाऊ घाडगे, तसेच नागरी कृती शाखेतील प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
आतापर्यंत असा मिळाला लाभ
गडचिरोली पोलीस दलातर्फे आजपर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट ११११, हाॅस्पिटॅलिटी १५२, ऑटोमोबाईल ११० अशाप्रकारे एकूण १ हजार ७८६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञानकेंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने ब्युटीपॉर्लर ७०, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन १२६, शेळीपालन ६७, लेडीज टेलर ३५, फोटोग्राफी ३५, मधमाशी पालन ३२, भाजीपाला लागवड ११४ अशा एकूण ५०४ युवा व महिलांना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
180921\18gad_1_18092021_30.jpg
पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्यासमवेत, समीर शेख, संदीप कऱ्हाळे तसेच प्रशिक्षणार्थी महिला.