पत्नीला थोबाडीत मारली अन् पत्नी जीवानिशी गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:53+5:302021-09-19T04:37:53+5:30

प्राप्त माहितीनुसार, कोरची मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर मुलेटीपदिकसा हे गाव आहे. त्या गावातील सुबायबाई सुभाष धुर्वे (३५ वर्षे) यांची ...

He hit his wife in the mouth and his wife went away | पत्नीला थोबाडीत मारली अन् पत्नी जीवानिशी गेली

पत्नीला थोबाडीत मारली अन् पत्नी जीवानिशी गेली

प्राप्त माहितीनुसार, कोरची मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर मुलेटीपदिकसा हे गाव आहे. त्या गावातील सुबायबाई सुभाष धुर्वे (३५ वर्षे) यांची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून बरी नव्हती. पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून सुभाष धुर्वे (४०) यांनी रुग्णालयात जाऊन औषधोपचार केले, पण त्या उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. पत्नी वेळेवर औषध घेत नाही, म्हणून सुभाषने रागाच्या भरात पत्नीच्या कानपटीत दोन झापडा मारल्या. यामुळे आधीच प्रकृती बरी नसल्यामुळे अशक्त झालेली सुबायबाई खाली कोसळली. त्यामुळे तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले.

तिला तपासल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

सुबायबाईला दोन मुले व एक मुलगी आहे. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी कोरची पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले करीत आहेत.

Web Title: He hit his wife in the mouth and his wife went away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.