खोदतळी शेतीसाठी हरित संजीवनी
By Admin | Updated: September 24, 2015 01:55 IST2015-09-24T01:55:19+5:302015-09-24T01:55:19+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली.

खोदतळी शेतीसाठी हरित संजीवनी
आरमोरी वन परिक्षेत्र : जलयुक्त शिवार योजना फळाला; शेतकऱ्यांमध्ये समाधान
जोगीसाखरा : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली. त्यामुळे मजुरांना रोजगार तर मिळालाच शिवाय पाण्याची योग्य साठवणूकही झाली. याचाच प्रत्यय आरमोरी तालुक्यातही आला. आरमोरी वन परिक्षेत्रात खोदतळी वन विभागाच्या पुढाकारातून अनेक ठिकाणी निर्माण केल्याने या भागातील शेतीसाठी हरित संजीवनी प्राप्त झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आरमोरी वन परिक्षेत्रात अनेक ठिकाणी खोदतळी निर्माण करण्यात आली. नव्याने रूजू झालेले वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी वन व वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्याबरोबरच जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना गावालगत जाऊन बळी पडण्याची वेळ येऊ नये, याकरिता जंगलात खोदतळी निर्माण करून बारमाही पाणी साठ्याची व्यवस्था केली. ठिकठिकाणी पाण्याची पातळी वाढविण्याचे पर्याय शोधण्यात आले. कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून मोठ्या उत्साहाने वन परिक्षेत्रात तलावाची निर्मिती केली. तसेच शेतीसाठी पाण्याचा वापर होईल, अशी संकल्पना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडली. वन परिक्षेत्रात खोदतळी निर्माण केल्याने पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचल्याने त्यांचे परिश्रम फळाला आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून खोदतळे निर्मिती, तलावांचे मजबुतीकरण, खोलीकरण केल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे वन परिक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)