कागदोपत्री सहकारी संस्थांवर टांगती तलवार
By Admin | Updated: July 6, 2015 01:45 IST2015-07-06T01:45:02+5:302015-07-06T01:45:02+5:30
जिल्ह्यातील कागदोपत्री चालणाऱ्या भोंगळ व अनियमित सहकारी संस्था संपुष्टात आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर

कागदोपत्री सहकारी संस्थांवर टांगती तलवार
३० सप्टेंबरपर्यंत मोहीम : ५० संस्थांचे झाले सर्वेक्षण
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्ह्यातील कागदोपत्री चालणाऱ्या भोंगळ व अनियमित सहकारी संस्था संपुष्टात आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर अवसायनाची कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत ११ तालुक्यात ५० संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. सर्वेक्षणानंतर कागोदपत्री चालणाऱ्या संस्थांवर अवसायनाची कार्यवाही होणार असल्याने काही संस्थांवर टांगती तलवार आहे.
सहकार आयुक्तांच्या आदेशावरून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण ४९५ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सहकारी संस्थांच्या नावावर कित्येक संस्थांकडून भोंगळ कारभार चालविला जातो. यातून अनेकांची लुबाडणूक होते. सहकार क्षेत्रातील गैरप्रकाराला आळा बसावा, तसेच अनियमित व भोंगळ सहकारी संस्था संपुष्टात याव्यात यादृष्टीने सहकार विभागाने सर्वेक्षणाचे हे कठोर पाऊल हाती घेतले आहे.