राजनगरीच्या स्वच्छतेसाठी पालकमंत्र्यांच्या हाती झाडू

By Admin | Updated: October 3, 2015 01:22 IST2015-10-03T01:22:00+5:302015-10-03T01:22:00+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत..

In the hands of Guardian Minister to clean up Rajanagari | राजनगरीच्या स्वच्छतेसाठी पालकमंत्र्यांच्या हाती झाडू

राजनगरीच्या स्वच्छतेसाठी पालकमंत्र्यांच्या हाती झाडू

अहेरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत शहरात मानव मंदिर, आठवडी बाजार व मस्जिद चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वत: हातात झाडू घेऊन मुख्य मार्गाची स्वच्छता केली. यावेळी शहरातील युवक, शाळकरी विद्यार्थी, भाजप व नाविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधी जयंती निमित्त अहेरी शहरातील रस्ते पूर्णत: स्वच्छता करण्यात आले. तसेच रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In the hands of Guardian Minister to clean up Rajanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.