अपंग शिक्षकाची ६० किमीवर बदली

By Admin | Updated: April 19, 2015 01:36 IST2015-04-19T01:36:33+5:302015-04-19T01:36:33+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासामुंडी येथील शिक्षक एस. पी. पुल्लुरवार हे २५ टक्के अपंग आहेत.

Handicapped teacher changed 60 km | अपंग शिक्षकाची ६० किमीवर बदली

अपंग शिक्षकाची ६० किमीवर बदली

एटापल्ली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासामुंडी येथील शिक्षक एस. पी. पुल्लुरवार हे २५ टक्के अपंग आहेत. मात्र त्यांच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करीत त्यांची नियमबाह्यापणे बदली ६० किमी अंतरावरील जिल्हा परिषद शाळा कचरेल येथे करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. बदली त्वरित रद्द न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेच्या वतीने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
अपंग शिक्षकांची बदली करताना अंतराचे भान ठेवणे आवश्यक असते. यानुसार अपंग शिक्षकांना लगतच्या शाळांमध्ये स्थानांतरित केले जाते. जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र एस. पी. पुल्लुरवार यांची बदली ६० किमी अंतरावरील कचरेल येथे करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. शिक्षक पुल्लुरवार व केंद्रप्रमुख मेकलवार यांची बदली करण्यात यावी, याकरिता पं. स. उपसभापती संजय चरडुके यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर केंद्रप्रमुख व शिक्षक यांची तत्काळ बदली करण्यात आली. परंतु बदली करताना गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षक पुल्लुरवार यांची बाजू ऐकून घेतली नाही. तसेच त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही, असा आरोप शिक्षक परिषदेने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
पुल्लुरवार हे ४५ टक्के अपंग असल्याने त्यांना आसपासच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बदली देणे गरजेचे होते. ४५ टक्के अपंग असल्याने त्यांना दीर्घकाळ प्रवास करणे शारीरिक योग्यतेनुसार त्रासदायक ठरते. अपंगांना आसपासच्या गावात बदली देणे आवश्यक असते. परंतु या सबबी लक्षात न घेता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची बदली केली. परंतु सदर बदली नियमबाह्यपणे करण्यात आली आहे. त्यामुळे पुल्लुरवार यांना त्रास होत आहे. नियमबाह्यपणे केलेली ही बदली त्वरित रद्द न केल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष डी. बी. बुद्धावार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Handicapped teacher changed 60 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.