वैनगंगा नदीचा अर्धा पूल कठड्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:41+5:302021-01-15T04:30:41+5:30

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा ...

Half of the Wainganga river bridge without walls | वैनगंगा नदीचा अर्धा पूल कठड्यांविना

वैनगंगा नदीचा अर्धा पूल कठड्यांविना

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलावर पूर्ण कठडे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वैनगंगा नदीवरील हा पूल आहे. या मार्गाने दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच दुचाकी, सायकलस्वार ये-जा करीत असतात. पुलावर अर्ध्यापर्यंत कठडे लावण्यात आले. पुलाच्या सुरुवातीला कठडे नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणारे व सायकलस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण पुलावर कठडे लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Half of the Wainganga river bridge without walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.