कोरडवाहू शेतीविषयी मार्गदर्शन
By Admin | Updated: September 1, 2014 23:35 IST2014-09-01T23:35:58+5:302014-09-01T23:35:58+5:30
कोरडवाहू शेती अभियानाबाबतची कार्यशाळा स्थानिक ग्राम सचिवालयाच्या सभागृहात १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान नाम फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले.

कोरडवाहू शेतीविषयी मार्गदर्शन
वैरागड : कोरडवाहू शेती अभियानाबाबतची कार्यशाळा स्थानिक ग्राम सचिवालयाच्या सभागृहात १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान नाम फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्या पुनम गुरनूले, सरपंच सेवानंद सहारे, प्रदीप बोडणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र तावेडे, पितांबर लांजेवार, भाष्कर बोडणे, विश्वनाथ ठेंगरे, घनश्याम हटकर, पांडुरंग बावनकर, डोनू कांबळे, बालाजी पोटावी, तलाठी कुबडे, पोलीस पाटील भानारकर, शामराव कावळे, प्रलय सहारे, नेताजी बोडणे, गजानन हर्षे, रमेश लांजीकार तालुका वैद्यकीय अधिकारी लंकेश कटरे, मंडळ कृषी अधिकारी जी. जी. भोयर, कृषी सहायक डी. ए. मते आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरवाहू शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के शेतीवर शेततळे खोदून देण्यात येणार आहेत. शेततळ्यातील पाणी काढण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटार पंप, सिमेंट बंधारे, शेतीची अवजारे ५० टक्के सुटीवर पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीबाबतचे प्रशिक्षण, कृषी दौरे काढण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले. कोरडवाहू शेती अभियानात वैरागडचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्त रांगी- धानोरा मार्गावरील टी पार्इंटजवळ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानाच्या नाम फलकाचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. (वार्ताहर )