महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन

By Admin | Updated: July 12, 2015 02:01 IST2015-07-12T02:01:42+5:302015-07-12T02:01:42+5:30

बँक आॅफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली व को-आॅपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार ...

Guidance for women | महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन

महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन

आरमोरीत मेळावा : शेकडो बेरोजगारांची उपस्थिती; युवकांना केले जाणार कर्जाचे वितरण
आरमोरी : बँक आॅफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली व को-आॅपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार पुरूष व महिलांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला. या मेळाव्यादरम्यान व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राज्य प्रकल्प समन्वयक व्ही. एम. पोतदार, अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे, नाबार्डचे डी. डी. एम. कृष्णा कोल्हे, कोआॅपरेटीव्ह बँकेचे पुणेकर, टी. डी. कापकर, हेमंत मेश्राम, विद्या मेश्राम, एन. डी. दोनाडकर, एस. एस. मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोतदार म्हणाले की, दिवसेंदिवस शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी स्वत:चा रोजगार थाटून इतरांनाही रोजगार पुरविण्याचे स्वप्न बघावे, बँकांच्या मार्फतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. आजचा बेरोजगार हा उद्याचा उत्तम उद्योजक बनला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारचे उद्योग स्थापन करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ उचलत युवकांनी स्वत:चा उद्योग स्थापन केला पाहिजे, असे आवाहन पोतदार यांनी केले.
उद्योग स्थापन करून तो यशस्वीपणे चालविण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीची गरज आहे. मेहनत करणारा युवक रोजगारामध्ये निश्चितच यशस्वी होतो, असे मार्गदर्शन अग्रणी बँकेचे प्रबंधक सिलारे यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन करून स्वत:चा उद्योग स्थापन करण्याचे आवाहन केले. मेळाव्याला आरमोरी परिसरातील अनेक युवक व युवती उपस्थित होत्या. मेळाव्यातील मार्गदर्शनानंतर जे युवक उद्योग स्थापन करण्यासाठी तयार होणार आहेत, त्याची चाचपणी करून कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Guidance for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.