बौद्धिक संपदा हक्कांविषयी मार्गदर्शन

By Admin | Updated: September 3, 2016 01:32 IST2016-09-03T01:32:38+5:302016-09-03T01:32:38+5:30

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्र (रूसा), राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर व गोंडवाना विद्यापीठ

Guidance on Intellectual Property Rights | बौद्धिक संपदा हक्कांविषयी मार्गदर्शन

बौद्धिक संपदा हक्कांविषयी मार्गदर्शन

गोंडवाना विद्यापीठात कार्यशाळा : पेटन्ट सेलची स्थापना करण्याचा मनोदय
गडचिरोली : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्र (रूसा), राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी बौद्धिक संपदा हक्क या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करून त्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर व रूसाचे सचिव तसेच प्रकल्प अधिकारी मनीषा वर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. कार्यशाळेला रूसा येथील शरद पाटील डॉ. संजय जगताप, संतोष गुप्ता, डॉ. वर्षा अंधारे, इशरत जहॉन, डॉ. सेबी जोश, उषा गुहा, प्रदीप जयस्वाल, डॉ. व्ही. एस. इरपाते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान मनिषा वर्मा यांनी रूसा योजनेची माहिती व योजनेचे महत्त्व तसेच उद्दिष्ट याबद्दल माहिती दिली. प्रत्येक विद्यापीठात पेटन्ट सेलची स्थापना करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी उद्घाटनपर भाषणात अनुसंधान व पेटन्ट यांचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेमुळे पेटन्टची नोंदणी प्रक्रिया उपस्थितांना पूर्णपणे समजेल अशा आशावाद व्यक्त केला. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर येथील संतोष गुप्ता व उषा गुहा यांनी बौध्दिक संपदा या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची समपर्क उत्तरे दिली. संचालन व आभार बीसीयुडी संचालक डॉ. एस. एम. रोकडे यांनी केले. यशस्वीतेसाठी देवेंद्र झाडे, दिनेश नरोटे, पदव्युत्तर विभागातील सहायक प्रा. डॉ. विवेक जोशी, प्रा. तारे, प्रा. काळे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Guidance on Intellectual Property Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.