शेतकऱ्यांना मूलभूत हक्कांविषयी मार्गदर्शन

By Admin | Updated: February 7, 2015 23:24 IST2015-02-07T23:24:37+5:302015-02-07T23:24:37+5:30

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचाची सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Guidance on Fundamental Rights to Farmers | शेतकऱ्यांना मूलभूत हक्कांविषयी मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मूलभूत हक्कांविषयी मार्गदर्शन

गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचाची सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मंचाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. बोमीडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप लांबे, डॉ. एस. एल. बोरकर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना बोमीडवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाचे देशाबद्दलचे प्रेम त्याच्या कृतीतून दिसायला हवे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे. सर्व भाषा, धर्म, प्रांत यांना मान देऊन देशाची अंखडता, एकात्मता व एकता यांचे रक्षण केले पाहिजे. जैवविविधता, वन्यप्राणी, जंगल, साधन संपत्ती, सार्वजनिक मालमत्ता यांचे रक्षण करण्याचे आवाहन एस. एम. बोमीडवार यांनी केले. शेतकऱ्याची फसवणूक झाल्यास त्याला ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याची गरज आहे. बियाणांच्या वापरात फसवणुकीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन केले.
डॉ. एस. पी. लांबे यांनी शेतकरीहक्क कायदा, पीक वाण संरक्षण, गॅट करार या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सीताराम मडावी यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. संदीप कऱ्हाळे तर आभार प्रा. योगीता सानप यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषक विज्ञान मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Guidance on Fundamental Rights to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.