प्रारूप यादीबाबत मार्गदर्शन
By Admin | Updated: March 8, 2015 00:59 IST2015-03-08T00:59:07+5:302015-03-08T00:59:07+5:30
२०११ साली प्रगणकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षणाची प्रारूप यादी तयार करण्यात आली असून ....

प्रारूप यादीबाबत मार्गदर्शन
अहेरी : २०११ साली प्रगणकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षणाची प्रारूप यादी तयार करण्यात आली असून या यादीवरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरुवात झाली आहे. याबाबत अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
दोन दिवसीय जनजागरण मोहिमेचा शुभारंभ ७ मार्च रोजी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष महेबुब अली तर प्रमुख अतिथी म्हणून व्यंकटेश चिलनकर, बब्बू शेख, अर्जुन कांबळे, सुरेश मडावी, सलीम शेख, अशोक आलाम, अविनाश गोरले, मृत्यालू कांबळे, यशवंत मडावी, परदेशी आलाम, इमरान खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महेबुब अली यांनी सदर यादी बीपीएल यादी एवढीच महत्त्वाची असल्याने या यादीबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांनी तत्काळ आक्षेप नोंदवावे. यासाठी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहावे, असे मार्गदर्शन केले.
सभेनंतर अहेरी तालुक्यातील चेरपल्ली, चिंचगुंडी, व्यंकटरावपेटा, महागाव, बोरी, चिंतलपेट, राजपूर पॅच, रामपूर, आलापल्ली, खमनचेरू, इतलचेरू, कनेपल्ली आदी गावांमध्ये ध्वनीक्षेपक व पत्रकांच्या सहाय्याने जनजागृती करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)