चामोर्शीत युवकांना मार्गदर्शन

By Admin | Updated: June 22, 2015 01:35 IST2015-06-22T01:35:05+5:302015-06-22T01:35:05+5:30

स्थानिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवकांना नेतृत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Guidance for Chamorshit Youth | चामोर्शीत युवकांना मार्गदर्शन

चामोर्शीत युवकांना मार्गदर्शन

चामोर्शी : स्थानिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवकांना नेतृत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक जमुना डगावकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिधान देवरी, स्वच्छता विभागाचे एन. एस. चावरे, गौतम गोवर्धन, मुख्याध्यापक विनोद रायपुरे, एस. सी. मोटघरे, डॉ. कावळे, खोकन गाईन, कृष्णा सरदार उपस्थित होते.
प्रधानमंत्री जनधन योजना, निर्मल भारत, स्वच्छ भारत अभियान, आदर्श गाव योजना, हागनदारीमुक्त गाव, नशामुक्ती आदी विषयांवर डॉ. देवरी यांनी मार्गदर्शन केले. विनोद रायपुरे, सोमनाथ बुरांडे यांनी युवकांना नेतृत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक देवानंद उराडे, संचालन रूपाली उराडे तर आभार रवी चुनारकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Guidance for Chamorshit Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.