बार्टीतर्फे काेराेनाबाबत काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:56+5:302021-05-06T04:38:56+5:30
वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विहीरगाव प्राथमिक आराेग्य केंद्राचे डॉ.नेताजी बनसोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर, नागपूरचे ...

बार्टीतर्फे काेराेनाबाबत काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन
वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विहीरगाव प्राथमिक आराेग्य केंद्राचे डॉ.नेताजी बनसोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर, नागपूरचे प्रकल्प अधिकारी हृदय गाेडबाेले उपस्थित हाेते. डाॅ.नेताजी बनसाेड यांनी कोरोना आजाराची लक्षणे, आहार, व्यायाम, प्राणायाम, आयुर्वेदिक काढा, वाफ आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ज्यांना तीव्र आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींनी घरगुती उपचारावर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ताे उपचार करावा, तसेच श्वसनासंबंधी काळजी घेऊन फुप्फुसे कशी निरोगी राहतील, याची काळजी घ्यावी. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, तसेच कोरोना आजारापासून स्वतःला वाचवायचे असेल, तर लसीकरण हा शेवटचा पर्याय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन देसाईगंजच्या समतादूत वंदना धोंगडे तर आभार जयलाल सिंद्राम यांनी मानले.