बांबूतोड व विक्रीबाबत मार्गदर्शन
By Admin | Updated: January 30, 2016 02:02 IST2016-01-30T02:02:48+5:302016-01-30T02:02:48+5:30
तालुक्यातील जमगाव येथील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत बांबूतोड व विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे.

बांबूतोड व विक्रीबाबत मार्गदर्शन
जमगावात ग्रामसभा : पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार
गडचिरोली : तालुक्यातील जमगाव येथील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत बांबूतोड व विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना बांबूची तोड व विक्री व्यवस्थानाबाबत गुरूवारी मार्गदर्शन करण्यात आले.
पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बी. एच. दुधाळ, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक गंगाधर तिडके यांनी जमगाव येथे जाऊन मार्गदर्शन केले. ग्रामसेवक पी. एम. दुर्गे व सरपंच वच्छला नरोटे यांच्या मार्फतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेदरम्यान प्रभारी अधिकारी दुधाळ यांनी पेसा कायदासंदर्भात मार्गदर्शन केले. बांबूचा लिलाव करताना घ्यावयाची काळजी बांबू लिलाव प्रचार व प्रसिद्धी, बांबू तोडण्याचे नियम, दाठीतल्या बांबूची कापणी कंत्राटदारांकडून करार करताना घ्यावयाची काळजी, आर्थिक व्यवहार, बांबूची प्रतवारी, पर्याय क्र. १ व पर्याय क्र. २ ची कारवयाची निवड आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ही ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार पेंदाम, नायब पोलीस शिपाई किशोर वनीकर, पोलीस शिपाई प्रमोद आभारे, जीवन मांदाळे, तोडासे यांच्यासह पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)