Guidance on Agribusiness | शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन
शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : पक्ष्यांच्या देखभालीची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व केंद्रीय कुकुट विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेती व्यवसायपुरक कुकुटपालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. एम. भुरले, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विशाल नरवाडे, डॉ. विक्रम एस. कदम, ज्ञानेश्वर ताथोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वाय. एस. वंजारी यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. कुकुटपालन हा कमी खर्चात होऊ शकणारा व्यवसाय आहे. कुकुटपालन करताना पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. पी. एम. बुरले यांनी कुकुटपालनासाठी सुधारीत जातींचे तसेच शास्त्रोक्त पध्दतीने कसे संगोपण करावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वळोवेळी पक्ष्यांना लसीकरण करण्याच्या पध्दती सांगितल्या. डॉ. विशाल नरवाडे यांनी कुकुटपालनाकरिता सुधारीत जातींची निवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी सहा दिवशीय कुकुटपालन प्रशिक्षणाबाबत शेतकºयांना माहिती दिली. संचालन ज्ञानेश्वर ताथोड यांनी केले. सदर प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे आहे. या प्रशिक्षणाला शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Guidance on Agribusiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.