गुडेल्लीवारांनी डागली स्वपक्षीयांविरोधात तोफ

By Admin | Updated: October 11, 2015 02:36 IST2015-10-11T02:36:56+5:302015-10-11T02:36:56+5:30

नाग विदर्भ आंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे जवळचे कार्यकर्ते ....

Güdeliyarar's gunfight against self-advocates | गुडेल्लीवारांनी डागली स्वपक्षीयांविरोधात तोफ

गुडेल्लीवारांनी डागली स्वपक्षीयांविरोधात तोफ

सोशल मीडियावर भावना : अहेरीचा रागरंग
अहेरी : नाग विदर्भ आंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे जवळचे कार्यकर्ते अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगर पंचायतमध्ये प्रभाग क्र. ११ मधून उमेदवारी न मिळाल्याने स्वपक्षीयांविरोधात सडेतोड तोफ डागली आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे कान आपल्या विरोधकांनी भरले व आपल्याविषयी दिशाभूल करणारी माहिती देऊन शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी कापण्यात आली. याचा अत्यंत दु:ख व वेदना आपल्याला आहे, अशी भावना त्यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.
अमोल गुडेल्लीवार यांनी म्हटले आहे की, अहेरी नगर पंचायतीसाठी अखेरच्या दिवशी आपण अतिशय दु:खाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला नाईलाज होता. गेल्या अनेक वर्षांपासून मी ज्या पक्षासाठी नि:स्वार्थपणे काम केले. कोणतीही निवडणूक असो, पक्षाचा मेळावा असो, दरवर्षी आयोजित होणारे क्रिकेट टुर्नामेंट असो किंवा राजांचा एखादा खासगी कार्यक्रम असो तो यशस्वी व्हावा म्हणून नेहमीच कठोर मेहनत केली. पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षाकडून फक्त नगर पंचायत निवडणुकीत माझ्या समाजाचे बहुसंख्य मतदार असणारा व सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव असलेला प्रभाग क्र. ११ कन्यका मंदीर वॉर्डातून आपण उमेदवारी मागितली. या प्रभागासाठी आपण सर्व दृष्टीने योग्य उमेदवार होतो व जिंकण्याची पूर्ण शक्यता होती. परंतु पक्षांतर्गत काही विरोधकांनी राजांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली व माझी उमेदवारी अखेरच्या क्षणाला कापण्यात आली.
गेले दोन दिवस माझ्या जीवनातील सगळ्यात कठीण क्षणाचे होते. परंतु या ठिकाणी आपण थांबलो तर आपण संपलो, म्हणून मला माझी पात्रता सिद्ध करण्यासाठी व पक्षाअंतर्गत विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी उमेदवारी दाखल करावी लागली व अपक्ष निवडणूक लढून आपला फैसला जनतेवर सोपविला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच गुडेल्लीवारांच्या या पावित्र्याने निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनाही मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Güdeliyarar's gunfight against self-advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.