सैनिकी शाळेत पालकमंत्र्यांचा सत्कार
By Admin | Updated: November 7, 2015 01:28 IST2015-11-07T01:28:37+5:302015-11-07T01:28:37+5:30
राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा गोंडवाना सैनिकी शाळेत दोन दिवसांपूर्वी पार पडल्या. या स्पर्धांचा समारोप ....

सैनिकी शाळेत पालकमंत्र्यांचा सत्कार
गडचिरोली : राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा गोंडवाना सैनिकी शाळेत दोन दिवसांपूर्वी पार पडल्या. या स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्र्यांनी गोंडवाना सैनिकी शाळेला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांचाही सत्कार भांडारकर यांनी केला.