नक्षलविराेधी कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:42+5:302021-04-08T04:37:42+5:30
गडचिराेली : नक्षलविराेधी अभियान राबविणाऱ्या जिल्हा पाेलीस दलाच्या सी-६० पथकाने गेल्या २९ मार्च राेजी उडालेल्या चकमकीत जिवाची पर्वा न ...

नक्षलविराेधी कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांकडून सत्कार
गडचिराेली : नक्षलविराेधी अभियान राबविणाऱ्या जिल्हा पाेलीस दलाच्या सी-६० पथकाने गेल्या २९ मार्च राेजी उडालेल्या चकमकीत जिवाची पर्वा न करता नक्षल्यांचा सामना करत पाच जणांना कंठस्नान घातले. या कामगिरीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काैतुक करत त्यांचा सत्कार केला.
पाेलीस मुख्यालयात झालेल्या या छाेटेखानी कार्यक्रमाला पाेलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, सीईओ कुमार आशीर्वाद, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पाेलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढाेले प्रामुख्याने उपस्थित हाेते.
खाेब्रामेंढा चकमकीत जहाल नक्षलवादी भास्कर हिचामी याच्यासह इतर चार नक्षलवादी मारले गेले हाेते. ना. शिंदे यांनी अभियानात यशस्वी कामगिरी केलेले अधिकारी आणि कमांडर यांना प्रशस्तीपत्र दिले. राज्य शासन सदैव पाेलीस दलाच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या प्राधान्याने साेडविण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले. त्यांनी जवानांचे काैतुक करत गडचिराेली जिल्हा एक दिवस नक्षलमुक्त हाेईल, असा विश्वास व्यक्त केला.