पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांसह अनेकांचा गौरव

By Admin | Updated: January 28, 2016 01:26 IST2016-01-28T01:26:32+5:302016-01-28T01:26:32+5:30

नक्षलवाद्यांशी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या पाच पोलिसांना प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Guard of Honor Many with the Police at the hands of Guardian | पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांसह अनेकांचा गौरव

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांसह अनेकांचा गौरव

युवा पुरस्काराचे वितरण : पाच पोलीस अधिकाऱ्यांना शौर्यपदक बहाल
गडचिरोली : नक्षलवाद्यांशी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या पाच पोलिसांना प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी, पोलीस हवालदार चंद्रय्या मदनय्या गोदारी, पोलीस नायक गंगाराम मदनय्या सिडाम, नागेश्वर नारायण कुमराम, बापू क्रिष्टय्या सुरमवार यांच्यासह बॉक्सिंग खेळासाठी गुणवंत खेळाडू म्हणून आदित्य सुधाकर मने, मार्गदर्शक म्हणून यशवंत दिवाकर कुरूडकर, शहरी व ग्रामीण भागात युवकांच्या विकासासाठी विविध शिबिराचे आयोजन करण्याकरिता जिल्हा युवा पुरस्कार युवक गटात संतोष बोलुवार, युवती गटात अर्चना लहुजी चुधरी, उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था म्हणून आरोग्य प्रबोधनी संस्था देसाईगंजचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश गभने यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Guard of Honor Many with the Police at the hands of Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.