शापोआ कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा

By Admin | Updated: February 4, 2016 01:23 IST2016-02-04T01:23:58+5:302016-02-04T01:23:58+5:30

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी शापोआ कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने ...

Guaranteed the questions of Shapao Employees | शापोआ कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा

शापोआ कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा

अर्थमंत्र्यांना निवेदन : आयटकने घेतली भेट
गडचिरोली : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी शापोआ कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी शेकडोच्या संख्येने सहभागी होऊन चंद्रपूर येथे आझाद मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार यांनी केले. शापोआ कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा, किमान १५ हजार वेतन देण्यात यावे, १० जुलै २०१४ च्या शासन निर्णयानुसार शापोआ कर्मचाऱ्यांना कामावर कायम करावे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय शापोआ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, प्रत्येक शाळेत गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, सर्व प्रकारचा खर्च शासनाने करावा, भाजीपाला, इंधन बिल व मानधन दर महिन्याच्या ५ तारखेला जि. प. द्वारे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Guaranteed the questions of Shapao Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.