कृषी कर्मचाऱ्यांचा आमदारांना घेराव
By Admin | Updated: December 23, 2016 01:01 IST2016-12-23T01:01:21+5:302016-12-23T01:01:21+5:30
गडचिरोलीचे तालुका कृषी अधिकारी आय. एन. शेख हे कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांशी

कृषी कर्मचाऱ्यांचा आमदारांना घेराव
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा : शेख यांच्यावर कारवाईची मागणी
गडचिरोली : गडचिरोलीचे तालुका कृषी अधिकारी आय. एन. शेख हे कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक करीत असून मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील महिला कृषी कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथे आमदार क्रिष्णा गजबे व विभागीय कृषी सहसंचालक यांना घेराव घातला व मागण्यांचे निवेदन सादर केले.
तालुका कृषी अधिकारी शेख यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी १७ डिसेंबरपासून जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेख यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. शेख यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमदार क्रिष्णा गजबे यांनी तसेच विभागीय कृषी सहसंचालकांनी प्रयत्न करावा, अशी मागणी केली आहे.