आष्टीत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST2020-12-25T04:28:36+5:302020-12-25T04:28:36+5:30

आष्टी : संत गाडगेबाबा मंडळाच्या वतीने रविवारी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने गाडगेबाबांना अभिवादन करण्यात ...

Greetings to Gadge Baba in Ashti | आष्टीत गाडगेबाबांना अभिवादन

आष्टीत गाडगेबाबांना अभिवादन

आष्टी : संत गाडगेबाबा मंडळाच्या वतीने रविवारी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संत गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष भोजराज क्षिरसगर, उपाध्यक्ष रामकृष्ण लोणारे, सचिव संजय लोणारे, सह सचिव सुरेश केळझरकर, कोषाध्यक्ष देवराव गुंडावर, सभासद मारोती जलवार, शामराव कोडूलवार, कुद्रपवार, अमोल मेडपल्लीवार, दिवाकर मानपल्लीवार, प्रकाश पेंदोरकर, रामदास पेदोरकर, कवडू चंद्रगिरीवार, वासुदेव रोहनकर, अंबादास गुंडावर, गीता केळझरकर, अर्चना केळझरकर, विनायक गुंडावार, नामदेव लोणारे तसेच धोबी समाजबांधव उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती दिली. संत गाडगेबाबा यांचे कार्य देशाला प्रेरणा देणारे आहे. नागरिकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

Web Title: Greetings to Gadge Baba in Ashti