उखाणे व वन मिनीट गेम उत्साहात
By Admin | Updated: January 23, 2016 01:45 IST2016-01-23T01:45:52+5:302016-01-23T01:45:52+5:30
लोकमत सखी मंच व जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोली ...

उखाणे व वन मिनीट गेम उत्साहात
उदंड प्रतिसाद : कल्पना लाड, संगीता चहांदे ठरल्या प्रथम
गडचिरोली : लोकमत सखी मंच व जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने ग्रंथ महोत्सवानिमित्त २१ जानेवारीला धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात हळदी- कुंकू, उखाणे व वन मिनीट गेम शो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना सखी सदस्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी विभा डांगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुधा सेता, वंदना गीते, किरण पवार, प्रीती मेश्राम उपस्थित होत्या. महिलांनी मुलांवर योग्य संस्कार करून भावी पिढी घडवावी. मुलांना ग्रंथ वाचनाची आवड लावावी, यातूनच त्यांचे व्यक्तित्त्व घडू शकते, असे प्रतिपादन विभा डांगे यांनी केले. महिला मेळाव्यात महिलांना भेटवस्तू म्हणून पुस्तिका वितरित करण्यात आल्या. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना प्रदीप लाड, द्वितीय क्रमांक मीना नेवलकर, तृतीय क्रमांक रजनी गहाणे यांनी पटकाविला. प्रोत्साहन बक्षीस मृणाल उरकुडे, सुरेखा घुमारे यांना देण्यात आले.
साखळी गेममध्ये प्रथम क्रमांक संगीता चहांदे, द्वितीय क्रमांक पुष्पा पाठक यांनी पटकाविला. दरम्यान स्वाती गायधने यांनी चारोळ्या सादर केल्या. स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. गुरूवारच्या कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार प्रीती मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनीता उरकुडे, भारती खोब्रागडे, उज्वला साखरे, किरण नमुलवार, रोहिनी मेश्राम, तिजारे, उषा भानारकर, अंजली वैरागडवार यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
२४ ला घोट येथे विविध कार्यक्रम
लोकमत सखी मंच शाखा घोटच्या वतीने २४ जानेवारीला येथील ग्राम पंचायत सभागृहात दुपारी १२.३० वाजता महिलांसाठी हळदी- कुंकू, उखाणे स्पर्धा, वन मिनीट गेम शो व लकी लेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आशा पेटकर (९४२१६६४७६३) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अल्का चांदेकर व असद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.