शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:06 IST

सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.

ठळक मुद्देसंभाजी चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड नागपूर आणि अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळेचे आयोजन दिनांक २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते़ या कार्यशाळेदरम्यान डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेला विभागीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत, अ‍ॅग्रोेव्हिजन फाऊंडेशनचे संतोष डुकरे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी सभापती नाना नाकाडे, आर.सी.ओ.एफ.चे सहसंचालक डॉ. वाय.व्ही.देवघरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, वृंदा काटे आदी उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान संतोष डुकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणारे फळ, सिंदी, आंबा व धानपीक यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शेतकºयांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. संभाजी चव्हाण यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, योजना, अनुदाने, निर्यातीतील संधी, निर्यात कशी करायची, निर्यातीसाठी असलेल्या सुविधा, परदेश व्यापार आदी बाबतची माहिती दिली. डॉ.प्रकाश पवार यांनी गडचिरोली जिल्हा सेंद्रीय पिकविल्या जाणाºया धान, तूर व इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकरी गटांमार्फत शेतमाल प्रक्रियेलाही गती दिली जात आहे. येथील सेंद्रीय शेती उत्पादकांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे, असे मार्गदर्शन केले.धानासोबतच आयुर्वेदिक पिकांचे उत्पादन करून प्रगतीकडे जाण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतमालाच्या माहितीबाबत काही शंका असल्यास शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोेली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी देशाअंतर्गत बाजारपेठ काबिज करून निर्यात प्रोत्साहन करण्यास प्रशासन अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वोतोपरी शेतकºयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.अमरशेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवस पिकासाच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अनिल तारू, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी