शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक ग्राम येवलीचा विकास आराखडा मंजूर

By admin | Updated: June 10, 2015 01:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत येवली गावाचा ग्राम विकास .....

आदर्श सांसद ग्राम योजना : गावात विविध दाखल्यांचे वाटप होणार
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत येवली गावाचा ग्राम विकास आराखडा ८ जून रोजी खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ग्राम विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी ग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, गावात दारूबंदी, गुटखाबंदी करावी, तसेच गावातील प्रत्येक नागरिकास सातबारा व इतर आवश्यक दाखले मोफत वितरित करण्यासंदर्भात गडचिरोलीचे तहसीलदार यांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर योजनेची खऱ्या अर्थाने या कार्यक्रमातून मुहूर्तमेढ रोवण्यात आली, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात बांधकाम, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पशुधन विभाग, ग्राम पंचायत, पोलीस विभाग आदींचाही आढावा घेण्यात आला. खा. अशोक नेते यांनी सांसद आदर्श ग्राम विकास योजनेचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे. ग्राम विकास आराखडा तयार करून विकासाकरिता आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधांचा समावेश केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. आराखड्यात समाविष्ट कामे विहीत मुदतीत करण्यासाठी प्रत्येक विभागाने दर महिन्याला अहवाल द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
या संपूर्ण नियोजन आराखड्याचे वाचन व संचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. यू. पचारे, तहसीलदार जाधव, सरपंच गीता विजय सोमनकर, उपसरपंच सुरेखा रुमाजी भांडेकर, बाबुराव कोहळे, विलास भांडेकर, ग्रा. पं. सदस्य व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)